अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. असेच काही भामट्यांना नगर पोलिसांनी गजाआड केले आहे. क्युआर कोड स्कॅन करून पैसे खात्यात जमा झाल्याचे भासवून दुकानदारांची लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी अहमदनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे.
विशेष म्हणजे हे सर्व भामटे पुण्यातील आहे. चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या सर्व आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली दुकानामध्ये जाऊन वस्तूची खरेदी करत असे, यानंतर ऑनलाइन पेमेंट करतो,
असे सांगून दुकानात लावण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करत होते. एका अँड्रॉइड ॲपचा वापर करत ऑनलाइन पेमेंट केल्याचा खोटा एसएमएस पाठवून लाखोंची फसवणूक करणारी टोळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे संजय अशोक सोनार,
शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता ( सर्व रा. भोसरी, पुणे) अशी असून, या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपींकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved