प्रा.राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.

चौंडी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वषार्पासून माजी मंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा निवडणुकीचा शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर चौंडेी ग्रामपंचायतीतही आता सत्तांतर झाले आहे. या ग्रामपंचायतीत काका  विरुध्द पुतण्याची लढाई रंगली होती.

या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी चौंडीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राम शिंदे यांचे पुतणे अक्षय शिंदे व बंधू अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोट बांधली होती.

अहमदनगर लाईव्ह 24