दारासमोर लाल रंगाची बाटली लावल्याने कुत्रे पळतात ही केवळ अंधश्रद्धा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- महानगरपालिकेची श्वान निर्बिजीकरण मोहीम ठप्प आहे. अशातच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. भटकी कुत्रे दारात येऊ नये यासाठी एक वेगळीच शक्कल नगरमध्ये लढवली जात आहे.

शहरात लाल रंगाचे पाणी भरून बाटल्या लटकवण्यात आल्या आहेत. शहरात अनेकदा कुत्र्यांमुळे हल्ले होतात नगरसेवक तक्रारही करतात परंतु प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

रस्त्यावर कुत्रे फिरत आहेत. यावर उपाय म्हणून बाटलीत लाल रंगाचे पाणी भरून जर ही बाटली दारात लटकवली तर कुत्रे येणार नाहीत. दरम्यान, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे म्हणाले,

लाल रंगाचा आणि कुत्रे काहीही संबंध नाही. दारासमोर लाल रंगाची बाटली लावल्याने कुत्रे पळतात ही केवळ अंधश्रद्धा आहे.

याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, केवळ अफवा आणि अनुकरणातून हे प्रकार होत आहेत.” – रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24