बुऱ्हानगरसह ५९ ग्रामपंचायती ताब्यात घेणार प्रा. शशिकांत गाडे यांचा निर्धार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-पंधरा वर्षापासून नगर तालुक्यात महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद आणि  पंचायत समितीत आपलीच सत्ता आहे.

आता ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा आपण महाविकास  आघाडी केल्याने ६५ % मतदान महविकास आघाडीच्या बाजूने येते. मग बुऱ्हाणनगरमध्ये सुद्धा आपलाच झेंडा असेल.

ग्रामपंचायतला महाविकास आघाडी झाल्याने बुऱ्हाणनगरसह नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायत महाविकास आघाडीच ताब्यात घेणार असा निर्धार शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

नववर्षात नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या पाश्र्­वभूमीवर तालुक्यातील महाविकास आघाडीच्यावतीने गावोगावच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे बोलत होते. गाडे म्हणाले की , जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याच्या गावात निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल.

गावात तीन पक्ष एकत्र आल्यावर विरोधकाचा पराभव निश्चित आहे. गावातील आपापसातील वाद मिटवून कामाला लागा. विजय आपलाच असल्याचे गाडे यांनी सांगितले.

यावेळी  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, काँग्रेसचे संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,

बाळासाहेब हराळ, गोविंदराव मोकाटे, इंजि. प्रविण कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर, रोहिदास कर्डिले, किसनराव लोटके, बाबासाहेब गुंजाळ, प्रकाश कुलट, केशर बेरड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24