Ahmednagar News : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील ३६७ लाभाथ्यांना ७ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असून,
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ५१ लाभार्थ्यांना कडबाकुट्टी, लेडीज सायकल आणि पिठ गिरणीसाठी अनुदानास मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकादवारे दिली.
राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध- दापकाळ योजना अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील सुमारे ३६७ लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव दाखल केले होते.
या प्रस्तावांना नकतीच मंजरी मिळाली असन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या आहेत.
समालकल्याण विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजनेमध्ये शालेय विद्यार्थीनींना सायकल,
शेतक-यांना कडबाकुट्टी तसेच महिलांकरीता पिठ गिरणी दिली जाते. तालुक्यातील ५१ लाभाथ्यांचे प्रस्ताव मंजरीसाठी दाखल झाले होते.
या प्रस्तावांना प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर या लाभार्थ्यांना २ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुर झाले आहे.
तालुक्यात शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्- यासाठी जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु असतो.
योजनांच्या अंमलबजावणीमध्ये तालुक्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. शासन आपल्या दारी उपक्रम तसेच योजनांच्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी लाभार्थ्यांना मार्गदर्शन सुरु असल्याने योजनांची यशस्वीता ना. विखे पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आधोरेखित होते.