राहुरी पाठोपाठ आता या कारागृहातील कैदी कोरोनाच्या विळख्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. हि घटना ताजी असतानाच आता श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातील काही कैद्यांना सर्दी, तापाची लक्षणे आढळून आली आहे.

कारागृहातील या 55 कैद्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 36 कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उपकारागृहातील कैद्यांना लक्षणे आढळून आल्याने 55 कैद्यांची कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचा निर्णय श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घेतला.

त्यांनी टेस्ट घेण्यासाठी आरोग्य विभागाला पाचारण करून त्यांची रॅपिड अँटीजन व घशातील स्रावांची नमुने घेतले. याचाचणीत कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहे.

शनिवारी सकाळपासून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे यांच्या देखरेखीखाली हे संक्रमित कैदी आहे.

संक्रमित कैद्यांपैकी 30 पुरुष व 6 महिला कैदी संक्रमित आढळले. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आरोग्य सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24