अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर उद्या पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यातच नगर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.
यामुळे जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणे नद्या तलाव तुडुंब भरून निघाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून यलो अलर्ट
4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे 7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग