अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
त्यात चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के इतका झाला आहे. सर्वाधिक पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात असून पावसाची ही टक्केवारी शंभर टक्क्याहून अधिक आहे.
तर दक्षिण भागातील पारनेर, जामखेड आणि कर्जत या तीन तालुक्यांमधील पावसाची टक्केवारी सरासरीच्या ७५ टक्के इतकी आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील दक्षिण भागात अतिवृष्टी झाली.
नदी, नाल्यांना पूर आले. जनावरे वाहून गेली. नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस ९१ टक्के इतका झाला आहे.
५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गटगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सर्वदूर पावसाचा इशारा दिला आहे.
नगर जिल्ह्यात ५, ६ आणि ७ सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान शनिवारी जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा शेवगाव, पाथर्डी, नगर या तीन तालुक्यांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. बीड-अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या भागात मोठा पाऊस झाल्याने जामखेड तालुक्यातील नद्या-नाल्यांनाही पूर आल