अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र लाभक्षेत्रातच पाऊस नाही. भंडारदरा धरणाचा परिसर हा पावसाचे माहेरघर समजले जाते.
चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागल्याने या परिसरातील शेतकरी हवादिल झाला आहे.
शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. याचा भात लागवडीवर वाईट परिणाम होत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे. १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे.
भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागली आहेत. या परिसरात भात हे प्रमुख पीक असून ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतु पाऊस न पडल्याने शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत.
पर्यटनाच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळत असतो, परंतु लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार बंद झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत भंडारदरा धरणात ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक झाली आहे.
पावसाअभावी खरीप हंगामातील भात लागवडीची कामे खोळंबली आहेत. भात लागवडीसाठी भात खाचरामध्ये पाणी असल्याशिवाय लागवड करता येत नाही. शेतात पाणी नसल्याने भातांची रोपे सुकत चालली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews