अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक हे ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असे सांगत आहेत. मात्र हा त्यांचा दावा डोळ्यात धुळफेक करणारा आहे.
तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असून विधानसभेचा वचपा नगरपरिषदेत काढणार, असा इशारा आमदार रोहित पवार यांना नाव न घेता लावला. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी चौंडी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुषंगाने माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत, याबाबत खुलासा केला.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, नुकत्याच ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. मात्र, यामध्ये ४१७ सदस्य निवडून आले. मात्र यामध्ये २०३ सदस्य हे भाजपचे आहेत.
२३ ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र आमदार रोहित पवार हे ८० टक्के ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, असे सांगतात.
मात्र त्यांचा हा दावा डोळ्यात धुळफेक करणारा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आमदार हे विकासाला मत द्या, असे सांगतात. मात्र, विकास कोठे आहे तो दाखवा, असा टोला शिंदे यांनी लगावला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले, राधाकृष्ण विखे व मी स्वतः कमिटीमध्ये आहे. मी कुठेही उभा राहणार नाही, असा खुलासा यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.