अहमदनगर बातम्या

अखेर मुहूर्त ठरला! अत्यंत साधेपणाने आणि कुठल्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता राम शिंदे ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

Published by
Ajay Patil

Ahilya Nagar News:- नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये कर्जत- जामखेड मतदार संघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ असून याठिकाणी भाजपने पहिल्याच यादीत प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.

सध्या जर आपण कर्जत-जामखेड मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणाची राजकीय हवा सध्या राम शिंदे यांच्या बाजूने दिसून येत आहे. कर्जत जामखेड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार विरुद्ध प्राध्यापक राम शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.

राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी त्यांचा मुहूर्त देखील ठरला आहे. आमदार शिंदे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून साधेपणाने म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शक्ती प्रदर्शन न करता ते त्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडणार आहेत.

प्रा. राम शिंदे कर्जत जामखेड मतदार संघासाठी शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पार्टीने कर्जत जामखेड मतदार संघामधून आमदार प्रा. राम शिंदे यांना सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाल्यानंतर राम शिंदे हे उद्या 25 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

याबाबतची माहिती स्वतः प्रा राम शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. याकरिता त्यांनी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्याबरोबर सल्ला मसलत केली व त्यानंतर उद्या शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी 12 वाजेनंतर 227- कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर या मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.

हा अर्ज भरताना इतर उमेदवारांप्रमाणे कुठल्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने, सामान्य व्यक्ती व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

या अर्ज भरण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नेत्यांनी नोंद घेऊन उपस्थित राहण्याची विनंती देखील त्यांनी फेसबुक पोस्टाच्या माध्यमातून केली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil