अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : रमेशगिरी महाराजांचे अयोध्येला प्रयाण ! विमानतळापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज हे काल गुरुवारी (दि.१८) अयोध्येला रवाना झाले आहे.

यावेळी युवानेते विवेक कोल्हे यांनी संत पूजन केले. त्यांच्या सन्मानार्थ संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमापासून काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत विवेक कोल्हे यांनी सहभाग नोंदवला. जय श्रीरामांच्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीत २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट (अयोध्या) च्या वतीने कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

महंत रमेशगिरी महाराज हे कोपरगावचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. अयोध्या येथे जाण्यासाठी मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी काल गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमातून काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रस्थान केले.

तत्पूर्वी त्यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या समवेत श्री काशी विश्वनाथ व राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कोपरगाव विधानसभा संत पूजन करून वंदन केले.

यावेळी श्री जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलासराव कोते, विश्वस्त अनिल जाधव, रामकृष्ण कोकाटे, शिवनाथ शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण,

अतुल शिंदे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्यासह साधू, संत, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, जय जनार्दन भक्त परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office