पोलीस निरीक्षकांची धडाकेबाज एंट्री; गुन्हेगारांचा बिमोड होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जामखेड शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी दबंग पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक जामखेडमध्ये करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक म्हणून संभाजी गायकवाड जामखेडला नुकतेच हजर झाले.

हजर झाले, त्याच रात्री चोरट्यांनी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले. मग काय आव्हानाचा स्वीकार करत गायकवाड यांनीही त्या चोरांना तातडीने मुद्देमालासह गजाआड केले.

ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिसांना गुंगारा देऊन फरार आसलेल्या सात वेगवेगळ्या गुन्ह्यातील सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

त्यांची ही कामगिरी पाहता नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतूक होत आहे. जामखेडला नव्याने पोलिस निरीक्षक म्हणून हजर झाल्यानंतर अशी धडाकेबाज कार्यवाही करणारे ते पहिलेच पोलीस निरीक्षक ठरले आहेत.

त्यांच्या या आक्रमकतेमुळे तालुक्यातील गुन्हेगारी प्रव्रत्ती, अवैध धंदे सावकारकी, विनापरवाना शस्र बाळगणाऱ्यांचा बिमोड करण्याचा व कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याचा संकल्प गायकवाड यांनी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24