अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील रांजणी गाव हे मोबाईल रेंज पासून अजूनही वंचित आहे. गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नाही. त्यामुळे हे गाव जगापासून खूप दूर आहे.
या संदर्भात आज राजांनी गावातील तरुणांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिप यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. यावेळी गावाला लवकरात लवकर कोणत्याही कंपनीचे टॉवर उपलब्ध करून देण्याची मागणी रांजणी येथील तरुणांनी केली आहे.
नगर तालुक्यातील रांजणी हे गाव नगर शहरापासून २६ कि. मी वर असणारे गाव आहे. गावाच्या चारही बाजूने डोंगर आणि दऱ्या आहेत. ३००० हजार लोकसंख्या असणारे हे छोटेसे गाव आजही जगापासून खूप दूर आहे. गावात कोणत्याही कंपनीच्या मोबाईल ला रेंज नाही.
त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वच लोक गावात राहायला नाहीत. गावातील जवळपास निम्मे कुटुंब शेतामध्ये राहायला आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तातडीने काही हॉस्पिटलची अडचण निर्माण झाली तर ऍम्ब्युलन्स किंवा मदतीसाठी कोणालाही बोलविता येत नाही.
मागील काही दिवसांमध्ये वेळेवर दवाखान्याशी संपर्क न झाल्याने काही व्यक्ती दगावलया देखील आहेत. मागील ४ महिन्यापासून शाळेतील मुलांचे ऑनलाईन वर्ग चालू आहेत. मात्र रांजणी हे एकमेव गाव असे आहे कि, या गावात कोणत्याही शाळकरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग करता आला नाही.
याकडे ग्रामपंचायत ने देखील अजून कोणतेही लक्ष दिले नाही.ग्रामपंचायत लक्ष देत नाही म्हटल्यावर आता गावातील तरुणांनी याकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे.आज (ता. २५ जानेवारी ) रोजी गावातील १०० तरुणांनी एकत्र येत १०० तरुणांचे साह्य असणारे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ याना दिले.
पालकमंत्री यांनी ” तंत्रज्ञानाच्या युगात एखादया सधन जिल्ह्यातील गाव मोबाईल रेंज पासून दूर असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.” मी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात असेही गाव असू शकते या बाबत मुश्रिप यांनी खेद देखील व्यक्त केला.याबाबत मोबाईल कंपनीशी बोलून लवकरात लवकर टॉवर उपलध्द करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सह्याद्री मल्टिसिटी निधी ली चे चेअरमन संदीप थोरात, आरोग्यमित्र तुषार पोळ, सक्षम अकॅडमी चे संचालक संदीप डरंगे,ग्राम पंचायत सदस्य भाऊराजे चेमटे,सुरेश चेमटे, तुषार पाटील, पवन चेमटे, प्रतीक लिपणे, नवनाथ झिपुरडे, नाना भेंडेकर, अशोक चेमटे ,
परशुराम सौदागर, निलेश चेमटे, संजय सौदागर, नंदकुमार चेमटे, नारायण लिपणे, संजय लिपणे, ज्ञानेश्वर चेमटे, जीवन चेमटे,प्रदीप लिपणे, शंकर काळे, किशोर गोरे, राहुल गोरे, सतीश लिपणे, आदी तरुणांच्या सह्या असणारे निवेदन देण्यात आले.