अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-एका १७ वर्ष ११ महिने वयाच्या अल्पवयीन नेवासा तालुक्यातील आरोपी मनोज अण्णासाहेब नन्नोर, वय २५ हल्ली रा. गणपती मंदिराजवळ, र॑भाजीनगर, केडगाव याने सदरमुलीला तू माझ्याबरोबर लग्न कर,
अशी फोनवर लग्नाची मागणी करून ८ महिन्यापासून ओळखीचा गैरफायदा घेत मुलींच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला तरी मी आत्महत्या करील, अशी धमकी देवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर ६ ते ७ वेळा इच्छेविरूदध बळजबरीने शारीरिक संबंध करून बलात्कार केला.
तू जर झालेली गोष्ट कोणाला सांगितली तर ‘मी आत्महत्या करीन, अशी आरोपी मनोज अण्णासाहेब नन्नोर, याने पीडित अल्पवयीन मुलीला धमकी दिली.
१ फेबुवारी रोजी मी तुझ्या आई-वडिलांना अडकविल असे म्हणत आई-वडील लग्न करण्यासाठी दुसरा मुलगा पहात असताना याचा राग येवुन अल्पवयीन मुलीच्या घरी जावून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन घरून विनयभंग केला.
काल याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज अण्णासाहेन नन्नोर याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मनोज नन्नोर या आरोपीला अटक केली असून घटनास्थळी डिवायएसपी विशाल ढुरे, पोनि राकेश मानगावकर यांनी भेट दिली. सपोनि रणदिवे हे पुढील तपास करत आहेत.