अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या राहत्या घरी ऑनलाईन अभ्यास करत असताना एका जनाने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हा खळबळजनक प्रकार नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडला आहे. आरोपी अविनाश बबन बनकर (वय-२१ वर्ष,रा. कुकाणा, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी अविनाश याने त्याच्या मोबाईल वरून अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर तब्बल ३० वेळा वारंवार कॉल करून तिला घराबाहेर येण्यासाठी तसेच प्रेम संबंध ठेवण्यासाठी फोन केले.
म्हणून पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अविनाश बबन बनकर याला नेवासा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.