अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा २४ तासाच्या आत जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : बिहार येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी बस स्थानकावर तो कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद केले. रोजाउद्दीन शाई हल्ली (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, मुळ रा. मोतीराजपुर, राज्य बिहार) असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर तु इथे पळुन आली असुन मी तुला रहायला जागा दिली आहे असे म्हणुन वेळोवेळी अत्याचार केला. तसेच याबाबत आरोपीची पत्नी फरीदा शाई हिने कोणाला काही सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत राहुरी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना याबाबत तपासाच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोनि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि.हेमंत थोरात, पोहेकॉ. गणेश भिंगारदे, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, पोना.फुरकान शेख, पोकॉ.अमृत आढाव, प्रशांत राठोड व चापोकॉ.अरुण मोरे यांना याकामी रवाना केले.

पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेताना आरोपी हा अहमदनगर शहरात येथे असल्याचे निष्पन्न झाले त्या अधारे आरोपींचा अहमदनगर शहरात शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी रोजाउद्दीन शाई हा पाथर्डी बस स्टॅण्ड परिसरात असुन कोठे तरी पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसा आहेर यांनी पथकास तशा सुचना दिल्या. पथकाने लागलीच पाथर्डी बसस्थानक येथे जावुन बातमीतील वर्णना प्रमाणे इसमाचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव रोजाउद्दीन ऊर्फ दाहरु अलिहुसेन ऊर्फ घुईल शाई (वय ४०, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी मुळ रा. अहुरा ता. छपराह, राज्य बिहार) असे असल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहेत.