अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कोल्हार-घोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या विरोधात सुगाव बुद्रुक फाट्यावर कोल्हार-घोटी राज्यमार्गावर सुगाव, मनोहरपूर, कळस ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जोपर्यत अकोले संगमनेर महामार्गाचे कळस पर्यंतचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत पुढील काम होऊ देणार नसल्याचा इशारा राज्य सचिव विजयराव वाकचौरे, संजय वाकचौरे यांनी दिला आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याच्या कामाला मंजुरी देताना सर्व प्रकारच्या तरतुदी केल्या आहे. चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नसल्याचे भाजपाचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.
तर अकोले तालुक्यातील खडी, मुरुम मातीचे मोठ्या प्रमाणात उतखणणं होत आहे. अकोले तालुक्यातील काम पूर्ण झाल्याशिवाय अकोले तालुक्यातील खडी, मुरूम, वाळू, रेती कळसच्या पुढे जाऊ देणार नसल्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र गवांदे यांनी सांगितले.
तसेच या आंदोलनासाठी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री. कडाळे, महसुल विभागाचे मंडलाधिकारी बाबासाहेब दातखीळे यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिले तसेच प्रत्यक्ष साईटची पाहणी केली.
लवकरच सबंधीत ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सुतोवाच विजयराव वाकचौरे व सुरेश नवले यांनी केले. अकोले पोलिस स्टेशनचे पीएसआय दीपक ढोमने यांनी चोख बंदोबस्त ठेवला.