आवर्षण प्रवण दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात मोहरी, नायगाव लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले असून, परिसरातील इतर तलावांत पावसाअभावी पाण्याची आवक कमी असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.
गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली होती. त्यावेळी तालुक्याला संजीवनी ठरलेल्या मोहरी तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यावर्षी अनेक तलावांमध्ये पाणी विसर्ग कमी असून, तलावात कमी पावसाअभावी पाणी कमी असल्याने परिसरातील तलाव परिसरात दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आकाशाकडे डोळे लावुन बघत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात (दि. १०) जुलै रोजी रात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोहरी तलाव एका रात्रीत ओव्हरफ्लो झाला असून, सांडवा ओसंडून वाहू लागला तसेच नायगाव तलावही शंभर टक्के भरल्याने नायगाव व मोहरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील उर्वरित परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागून राहिली आहे.
लघु पाटबंधारे प्रमाणात तलावात कमी पाणी असल्याने गेल्या आठवड्यात अतिवृष्टी पावसामुळे अनेक शेतीचे, शेती पिकांचे नुकसान झाले सध्या खर्डा परिसरात रिपरिप मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने पिके पिवळे पाडण्याची भीती शेतकऱ्यांना धास्तवू लागली आहे.
पाटबंधारे विभागाच्या मोहरी १००% (१.५२ दशलक्ष घनमीटर) व नायगाव १०० % (१.८९ दशलक्ष घनमीटर) तसेच धोत्री व रत्नापूर तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून वाहू लागले तर पिंपळगाव आळवा लघु पाटबंधारे तलावात २९.६५% टक्के (०.८४ दशलक्ष घनमीटर ), तेलंगशी १.८९% टक्के (०.०१ दशलक्ष घनमीटर), अमृतलिंग ११.९० % (०.१५ दशलक्ष घनमीटर) जवळके ल.पा. तलाव निरंक तर खैरी २९.५२% म्हणजे ५.४२५ दशलक्ष घनमीटर एवढा आज रोजीचा पाणीसाठा खां लघुपाटबंधारे सिंचन शाखा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार उपलब्ध साठा आहे.
अवर्षण प्रवण दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामखेड तालुक्यात खैरीसह अनेक लहान मोठे मध्यम, लघु, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी प्रकल्प आहेत. या प्रकल्पवर अवलंबून असणारे सिंचन, पिण्याच्या पाणी, वन्यजीव, प्राणी, पशु पक्षी, यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी दमदार पाऊस पडून तलावात पाणी आले तरच तालुक्याला पाणीटंचाई
भेडसावणार नाही.