अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील ३२ गावांतून जोरदार पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून धरणातील पाणीसाठ्यात नवीन पाण्याची आवक होत आहे.
त्यामुळे धरणांचा पाणीसाठा नियंत्रित ठेवून जादा येणारे पाणी ५ हजार क्यसेकच्या वर प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. मागील चोवीस तासांत घाटघर, पांजरे व रतनवाडी येथे सहा इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली.
हरिश्चंद्रगड परिसरातील पाचनई, कुमशेत व मुळा पाणलोट क्षेत्रात पडत आहे. संततधार पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढली.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील साठा १० हजार ७४९ दशलक्ष घनफूट (९७.३६ टक्के), निळवंडे ७ हजार १७८ दलघफू (८४.९४ टक्के),
मुळा धरणात २१ हजार ६०२ दलघफू (८३.८ टक्के) व आढळा धरणात ९८६ दलघफू (९३.२) टक्के होता. भंडारदर धरणाच्या स्पीलवेमधून ४ हजार ७२४ क्युसेक्स व भंडारदर वीज प्रकल्प क्रमांक एकमधून
८१६ क्युसेक व निळवंडे धरणाच्या स्पीलवेमधून ४ हजार ७१६ क्युसेक व वीज निर्मितीसाठी ७१० क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील ओझर येथील साठवण तलावातून प्रवरा नदीपात्रात ६ हजा ९७३ क्युसेकने व कोतूळजवळून मुळा पात्रातून ६ हजार २६० क्युसेकने मुळा धरणाकडे ओघ सुरू आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या
२४ तासांत पाऊस : कंसातील एकूण पाऊस- घाटघर १५५ (४८०८ मिमी), रतनवाडी १४६ (३८२०), पांजरे १४५ (३४०२), वाकी ७५ (२१७२), भंडारदरा ८५ (२८६२), निळवंडे १९ (९३९), मुळा ३ (७१६), आढळा २ (२३२) पावसाची नोंद करण्यात आली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved