‘एप्रिल फुल’ चे संदेश पाठविण्या अगोदर ‘ही’ बातमी नक्की वाचा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘ एप्रिल फुल ‘ चा दिवस सगळे एप्रिल फूलच्या निमित्ताने सर्वाना मस्करीचे मेसेज एकमेकांना पाठवत असतात . पण उद्या(१ एप्रिल ) जर कोणी एप्रिल फुल अथवा अफवांचे मेसेज फॉरवर्ड केले तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत .

सर्व लोक सोशल मीडियाचा वापर करतात . त्यामुळे अनेक मेसेज फॉरवर्ड होत असतात . त्या मेसेजची शाहनिशा न करता ते पुढे पाठवले जातात पण आता महाराष्ट्र राज्याने याबद्दल निर्णय घेतला आहे.आता तुमच्या सोशल मीडिया वर क्राईम ब्रॅन्चची नजर असणार आहे त्यामुळे सावधान! 

कोणीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल आहे . सध्या देशावर कोरोनाच संकट घोंगावत आहे . त्याच पार्श्वभूमीवर कोणी चुकीचे मेसेज अथवा अफवा पसरविली तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24