अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, अहमदनगर जिल्हा शाखा यांच्या वतीने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गाव तेथे वाचनालय या उपक्रमाकरीता पुस्तकांची भेट देण्यात आली.
डॉ.दिपक शिकारपुर लिखित आयटी करियर 2020 या पुस्तकांचा संच यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हासचिव व शिवतेज मित्र मंडळाचे समन्वयक संतोष कानडे, प्रा.सोपान शेळके, शरद पुंड, देवीदास दहातोंडे, प्रशांत दहातोंडे,
संतोष बोरुडे आदी उपस्थित होते. प्रशांत गडाख यांनी सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. शिवतेज मित्र मंडळ ट्रस्ट राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.