अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून मा.प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, ऑडीटर, रयत शिक्षण संस्था सातारा, यांचे वाचन संस्कृती या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले.त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे व्यक्तिमत्व जीवन व चरित्र विविध कथात्मक रूपाने स्पष्ट केले व वाचनाने जीवन समृद्ध होते,
सामाजिक भान निर्माण होते.ग्रंथ जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात.वाचनाची अभिरुची वाढविणे काळाची गरज आहे.असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.भाऊसाहेब कराळे यांनी, वाचन संस्कृती ही बौद्धिक ऊर्जा निर्माण करते.
आयुष्याची जडणघडण व वैचारिक बैठक ही वाचनाने तयार होऊ शकते, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे तरुणांना प्रेरक आहेत.असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ.वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन डॉ.योगिता रांधवणे यांनी केले या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष(आयक्यूएसी ), प्रा.एम.आर.खान, डॉ.हेमंतकुमार अकोलकर, प्रा.विलास एलके, डॉ.शंकर केकडे यांनी सहकार्य केले.प्रा.शुभांगी ठुबे यांनी आभार मानले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved