अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे.
आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे चिंता वाढली होती.
परंतु आता भगवतीपूरमध्ये शनिवारी शिर्डी येथे कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविलेल्या 14 पैकी 13 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने भगवतीपूरकरांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.
त्यातील उर्वरित एका व्यक्तीचा अहवाल अद्यापि प्राप्त झाला नसल्याची माहिती कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दिली.
तसेच काल (रविवार) येथील कंटेनमेंट झोन वस्तीवरील 16 जणांना शिर्डी येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोरोना तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेले नव्हते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews