अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत कांदा आवकेत 5 हजार गोण्यांनी वाढ झाली आहे.
बुधवारी 45 हजार 59 गोण्या (25 हजार 230 क्विंटल) इतकी कांदा आवक झाली. सोमवारी 40 हजार गोण्या आवक झाली होती. मोठ्या कलर पत्ती कांद्याला 3000 ते 3200 रुपये भाव मिळाला.
तर मिडीयम सुपर कांद्याला 2500 ते 2800 रुपये, गोल्टा कांद्याला 2200 ते 2500 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 2000 रुपये, जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला.
एक-दोन लॉटला 3300 ते 3400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. सोमवारी काही वक्कलांना 3800 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. तर जास्तीत जास्त भावात प्रतिक्विंटल 400 रुपयांनी घट झाली.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी खुश होत आहेत.उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट
येथे कांदा खरेदीसाठी येतात व प्राधान्य देतात. त्यामुळे कांदयास नेहमी चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकरी बांधवांत नेहमी समाधानाचे वातावरण असते.