अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेले अनेक महिने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दरम्यान या काळात कोरोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 26 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणार्या, संचारबंदी असताना बाहेर फिरणे,
बनावट पासद्वारे फिरणे, दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती, चार चाकीमध्ये तीनच व्यक्ती, दुकान वेळेआधी न उघडणे, वेळ संपली तरी सुरू न ठेवणे असे विविध नियम केले गेले होते.
या नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, दुकानदार-व्यावसायिक, संस्थांशी संबंधितांवरविविध पोलीस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त केली गेली गेली.
अशा प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करणारांविरुद्ध हे 26 हजार 700 गुन्हे दाखल आहेत. आता या प्रत्येक गुन्ह्याचे स्वतंत्र दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात पाठवावे लागणार आहे.
यामुळे 2019 वर्षाच्या तुलनेत 2020 मध्ये जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची संख्या सुमारे चौपट झाली. 2019 मध्ये जिल्ह्यात सर्व प्रकारचे एकूण गुन्हे 11 हजार 195 दाखल होते.
आता 2020 मध्ये 43 हजार 797 गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांपैकी 69 टक्के गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 77 टक्के आहे.