जिल्ह्यातील विशेष पुन:रिक्षण कार्यक्रम अंमलबजावणीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी व्यक्त केले समाधान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याशी चर्चा केली.

अधिकाधिक नवमतदार नोंदणी, मतदान केंद्रांचे बळकटीकरण तसेच दुबार मतदार वगळणी करण्याबाबत या विशेष मोहिमेत भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हास्तरावर विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कार्यवाहीबाबत श्री. सिंह यांनी समाधान व्यक्त केले.

दिनांक 15 डिसेंबर 2020 पर्यत संपुर्ण अ‍हमदनगर जिल्‍हयात भारत निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमानुसार हरकती आणि दावे स्विकारावेत आणि सर्व 12 विधानसभा मतदार संघातील निवडणूक शाखांनी सर्व दावे व हरकती या निराकरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश यावेळी श्री. सिंह यांनी दिले. आज सकाळी प्रधान सचिव व मुख्‍य निवडणूक अधिकारी बलवंत सिंह तसेच अवर सचिव श्री. वळवी यांचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्वागत केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील तसेच निवडणूक शाखेचे तहसीलदार, नायब तहसीलदार यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री.सिंह यांनी जिल्हधिकारी डॉ. भोसले यांच्या सोबतच्या चर्चेच भारत निवडणूक आयोग यांच्‍या निर्देशानुसार सुरु असलेल्‍या विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम -2021 च्‍या अनुषंगाने विविध बाबींचा सविस्‍तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी त्यांना या कार्यक्रम अंमलबजावणीची माहिती दिली.

जिल्‍हयातील एकुण 12 विधानसभा मतदार संघात दुबार आणि अनेकविध मतदारांची संख्‍या ही 6089 असून त्‍यात ऑनलाईन पध्‍दतीने छायाचित्र पडताळणी करण्‍याचे काम पुर्ण करण्‍यात आले आहे. तसेच जिल्‍हयात मतदार यादीत फोटो नसलेले एकुण 1864 मतदार असून बीएलओ मार्फत फोटो गोळा करण्‍याची कार्यवाही सुरु असून 50 टक्‍के पेक्षा जास्‍त काम झाले आहे. येत्या 15 डिसेंबर 2020 पर्यत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

अहमदनगर जिल्‍हयातील मतदार छायाचित्र ओळखपत्रातील त्रृटी, अनेक मतदार ओळखपत्र असलेले मतदार, मतदार यादीतील तांत्रिक चुका (Logcal Errors) ही कामे प्रगतीपथावर असून पडताळणीअंती नमुना – 7 भरुन वगळणी करण्‍याची कार्यवाहीसुद्धा विहित वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्‍या तक्रार निवारण पोर्टलवरील जिल्ह्याच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी दैन्‍ंदिन स्‍वरुपात निकाली काढल्‍या जात असल्‍याने त्‍याबाबत कोणतीही प्रलंबितता नाही, अशी माहितीही डॉ. भोसले यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24