अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासकीय तूर खरेदीसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी नोंदणी २८ डिसेंबर २०२०
पासून जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, पाथर्डी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय पालवे यांनी दिली.
पालवे म्हणाले, केंद्र सरकारने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने पाथर्डी तालुक्यासाठी जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्थेची नियुक्ती करण्यात आली.
संस्थेला दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत या वर्षी तूर पिकासाठी ६ हजार रुपये दर निश्चित केला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक अाहे.
त्यासाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, ऑनलाइन पीकपेरा असलेला सातबारा व आठ अ उतारा, तसेच मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन केले.