अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विद्यापीठांच्या अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. परंतु विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत अनेक मतांतरे झाली. मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला आहे.
यासाठी महाविद्यालयांना परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार आहे. जिल्ह्यात अंतिम परीक्षांसाठी 36 हजार 333 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेली आहे.
यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे. न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांनी ही परीक्षा घेण्याबाबत तयारी सुरू केली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षेसाठी
जूनमध्ये नगर जिल्ह्यातील 36 हजार 333 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे नोंदणी केलेले आहे.या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी जिल्ह्यातील महाविद्यालयांना करायची असून त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग तसेच इतर शासकीय नियमांचे पालन करण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत.
असे आहेत अंतिम वर्षाचे परीक्षार्थी
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved