अहमदनगर बातम्या

राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडून आमदार खासदार व मंत्रिपदाच्या ऑफर आल्या, मात्र सर्व धुडकावत मी सामाजिक कामांनाच महत्व दिले.

सामाजिक कामांमुळेच मी आज राष्ट्रीय स्तरावर काम करत पूर्ण देशाची सेवा करू शकलो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे नूतन चेअरमन सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कापळे, अजिनाथ हजारे तसेच भाजपचे नवनिर्वाचीत नगरसेवक प्रदीप परदेशी, महेंद्र गंधे, वसंत लोढा, अभय आगरकर हे उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले कि, सध्याच्या परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले अंत्योदयचे विचारच आज देशास तारू शकतात.

तळागाळातील नागरिकांना उभे करत सुरक्षित करण्याचे काम पतसंस्था चळवळ करत आहे. त्यामुळे पतसंस्था व्यवस्था टिकली पाहिजे.

पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे कामकाजही दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावरच चालत असल्याचे पाहून आनंद होत आहे. नगर शहरात असलेले मैदाने हे एकेकाळी नगरची शान होती.

मात्र आता ही मैदाने ओस पडत आहेत, अशी खंत पोपटराव पवार यांनी व्यक्त करत मैदानांसाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office