नगर जिल्ह्यातील ‘या’ठिकाणी अडकलेल्या तब्बल एक हजार गिर्यारोहकांची सुटका…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे या भागात अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजूर पोलीस व जहागीरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पूर आला होता.

शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते. मात्र सकाळी ९ वाजल्यापासून प्रचंड पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखर खाली उतरुन आले. मात्र नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागीरवाडी या ठिकाणी पोहचू शकले नाही.

तेव्हा काही गिर्यारोहकांनी हेल्पलाईनवर फोन करत याबाबत माहिती दिली. हा संदेश तातडीने राजुर पोलीस स्टेशनला प्राप्त होताच येथील पोलिस घटनास्थळावर हजर झाले.

तोपर्यंत जहागीरदार वाडीतील काही व्यावसायिक, गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहात साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यु ऑपरेशन सुरूच होते. संध्याकाळपर्यंत एक हजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलीस व गावकऱ्यांना यश आले होते.