अहमदनगर बातम्या

‘जायकवाडी’ तून बंधाऱ्यात पाणी सोडा ! अन्यथा शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील महत्वपूर्ण अशा ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.२ च्या अंतर्गत असणाऱ्या १७ गावांतील तलाव व बंधारे भरून मिळावेत अन्यथा शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करतील,

अशा मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांना अहमदनगर येथे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ताजनापूर लिफ्ट योजनेचे जनक असलेले जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या संघर्षाला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. १९६५ सालापासून शेवगाव तालुक्याचा तीन पिढ्यांचा लढा आता पूर्णत्वाला आलेला आहे.

जायकवाडी धरणाच्या जलाशयालगतच्या गावांसाठी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.२ योजना होती. अॅड. शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली १९९९ पासून चालत आलेल्या संघर्षामुळे शेवगाव तालुक्यातील १७ दुष्काळी गावांचा म्हणजे प्रभूवाडगाव, गदेवाडी,

नजीक बाभूळगाव, चापडगाव, राक्षी, ठाकूर निमगाव माळेगाव-ने, वरखेड, सोनेसांगथी, हसनापूर, कोळगाव, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बुद्रुक, आंतरवाली, या १७ गावांचा समावेश झालेला आहे. आता योजनेचे ठिबक सिंचनच्या कामाव्यतिरिक्त बरीचशी कामे जवळपास पूर्ण होत आलेली आहेत.

शेवगाव तालुक्याने जायकवाडी प्रकल्पामध्ये २९ सुपीक गावे गमावली आहेत. या बदल्यात जायकवाडी धरणामध्ये ३.८ टी.एम.सी. पाणी शेवगाव तालुक्याच्या ताजनापुर लिफ्ट या नावाखाली राखीव ठेवण्यात आलेले आहे. अद्याप १७ गावांत ठिबक सिंचन करण्याचे बाकी आहे. अशा परिस्थितीत आता या योजनेबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.२ साठी कोट्यवधी रुपये खर्च करून पंपहाऊस बसविले आहेत. पाईपलाईन झालेल्या आहेत, १७ गावांतील पाच विविध ठिकाणी मोठमोठ्या पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आलेल्या आहेत.

या १७ गावांतील तलाव व बंधारे खानापूर लिफ्ट (ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. २ मधून भरून देण्यात यावेत. जेणे करून या गावांतील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येतील. त्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.

यावर्षी शेवगाव तालुक्यातील एकूण ५ मंडलातील गावे दुष्काळी पट्टयातील आहेत. ही मंडले ‘दुष्काळ सदृश स्थितीतील गावे’ म्हणून जाहीर केलेली आहेत. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.२ मधील बहुतांशी गावे दुष्काळसदृश गावे म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत.

सबच अशा वेळेला अधिक दिरंगाई न करता शेवगाव तालुक्याच्या नावाने जायकवाडी धरणात असलेले ताजनापूर लिफ्टच्या दुसऱ्या टप्याचे २.२ टी.एम.सी पाणी या १७ गावातील सर्व तलाव व बंधाऱ्यामध्ये तातडीने सोडण्यात यावे अन्यथा शेतकरी जलसंपदा विभागाच्या

कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करतील. या वेळी रामकिसन मडके, सोनेसांगवीचे सरपंच, जालिंदर कापसे, उपसरपंच अंतरवाली बु.चे रामजी मडके, रामकिसन सांगळे आदी उपस्थित होते. निवेदनाच्या सर्व सबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office