अहमदनगर बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये धर्म, देश, संस्कृती सुरक्षित – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज मंदिरात कानिफनाथांच्या मूर्तीची स्थापना झाली. या संपूर्ण वादात अनेक हिंदू संघटनांनी येथे आपली हजेरी लावली;

पण राजकीय व्यक्ती म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला.

यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, सन १२२७ अगोदरचे हे कानिफनाथांचे मंदिर आहे तशी नोंद ही सापडते; परंतु अचानक काहींनी २००५ मधे हे मंदिर व जमीन आमचीच असून ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले;

परंतु तेथील हिंदू समाजाने यावर कायदेशीर भूमिका घेउन वाद न्यायालयात नेला. मागील तीन वर्षांपासून हा विषय चर्चेत आहे. २०२३ मधे राहुरी तालुक्यामध्ये हे मंदिर व इतर काही घटनांमुळे सकल हिंदू समाजच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला होता.

यात कर्डिले, आमदार नितेश राणे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग यांच्या भूमिका प्रमुख होत्या. गुहा येथील प्रश्नीदेखील कर्डिले यांनी राजकीय व्यक्ती असून योग्य भूमिका घेतली. यानिमित्त राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने नगर येथे कर्डिले यांचा आभार व सत्कार कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी कर्डिले म्हणाले की, गुहा येथील कानिफनाथ महाराज मंदिर प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी सामंजस्य दाखवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये धर्म, देश, संस्कृती सुरक्षित आहे आणि तेच वैभव परत मिळत आहे, ही आपल्या सर्वासाठी आनंदाची व गर्वाची गोष्ट आहे. गुहा ग्रामस्थांच्या पाठिशी आपण सदैव उभे राहू, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश बेग, पत्रकार समीर माळवे, संदीप लांडे, संकेत चव्हाण, महेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office