अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आमच्या जंगी स्वागताने काहींना इतकी अडचण वाटते की निलेश लंके याने पारनेर तालुका सोडून कुठेच जाऊ नये. जिल्ह्याच्या व्यासपीठावरून लंकेवर टीका करण्याचा धंदा झालाय.
तुझं माझं कुठे जुळेल का? तुझ्याकडे सगळं आहे. माझ्याकडे ही जनता आहे. मात्र मी सुद्धा राजकारणातील आखाड्याचा अस्सल पैलवान आहे. त्यामुळे अनेक डाव मलाही येतात.
हे डाव आले नसले तर मला सतरंज्या उचलाव्या लागल्या असत्या. तुम्हाला धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांचे नाव न घेता केली.
पाथर्डी शहरात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील २०० मल्लांनी सहभाग घेतला आहे.
पुढे आ.लंके म्हणाले की, या नेत्याने पाथर्डीच्या कार्यक्रमात माझ्या कपड्यांवर सुद्धा टीका करायची संधी सोडली नाही. मागील विधानसभेला समोर पैलवान सुद्धा दिसत नाही असे म्हणणाऱ्यांचे काय झाले.
ढाकणे मी दोघेही पवार साहेबांचे चेले असून पुढच्या वेळी ढाकणे हे कुस्ती जिंकणारच आहे. राजकीय आखाड्यातील मी सुद्धा पैलवान असल्याने अनेक डाव मलाही येतात.
हे डाव आले नसले तर मला सतरंज्या उचलाव्या लागल्या असत्या असे शेवटी लंके म्हणाले. प्रताप ढाकणे म्हणाले, लंके व मी रस्त्यावरचे पैलवान आहोत,
तुम्ही खुराक खाऊन मोठे झाले असाल मात्र आम्ही भाकरी खाऊन मोठे झालेलो पैलवान आहोत. आमचे नाव घेतल्याशिवाय तुमचे भागत नाही.