अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शेवगाव तालुक्यात राहणारा सोहेल तांबोळी याने काही दिवसांपूर्वी बुलेट सावेडीच्या शोरूममध्ये आणली. तांत्रिक बिघाडाची कोणतीही माहिती न देता शोरूमच्या आवारात पेट्रोल टाकून बुलेट (क्र. एमएच 17 सीएल 8055) पेटवून दिली.
तसेच त्याच्यासह इतर 10-12 जणांनी गोंधळ घालून तेथून निघून गेले. दरम्यान हा धुडगूस घालणाऱ्या सोहेल तांबोळी (रा. शेवगाव) विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याला मदत करणारे इतर 10 ते 12 जणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी खुद्द पोलिसांनीच फिर्यादी होत हा गुन्हा नोंदविला.
पोलीस शिपाई संतोष मगर यांनी फिर्याद दिली आहे. बुलेटवर ज्वलंनशील पदार्थ टाकून ती पेटविल्याची क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
तोफखाना पोलिसांनी गोपनीय पध्दतीने या प्रकाराचा छडा लावत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 7 जानेवारी रोजी सोहेल तांबोळी याने बुलेट सावेडीच्या शोरूममध्ये आणली.
मॅनेजरला कोणतीही माहिती न देता पार्किंगमध्ये बुलेटवर पेट्रोल टाकून ती पेटविली. त्याच्यासह इतर 10-12 जणांनी गोंधळ घालून तेथून निघून गेले. पेटविलेल्या दुचाकी शेजारी शोरूमच्या नव्या कोर्या बुलेट उभ्या होत्या.
बुलेटला लागलेली आग इतरत्र पसरून इतर दुचाकीही जळून मोठी वित्तहानी तसेच जिवीतहानी होऊ शकते याची जाणीव असतानाही सोहेल तांबोळी याने हे कृत्य केले.
बुलेट पेटविण्यासाठी सोहेल तांबोळी यास इतर 10-12 अनोळखी व्यक्तींनी मदत केली. त्यामुळे तांबोळीसह इतर 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.