अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- तेलीखुंट ते भिंगारवाला चौक,मोची गल्ली,सराफ बाजार, तांबटकर गल्ली येथील अतिक्रमण खुप वाढले आहे,
यामध्ये मोठे दुकानदार हे रस्त्यात गाड्या लावतात,त्यांचेच छोटी छोटी दुकाने रस्त्यावर लावून पूर्ण रस्ता अडवतात,दुकानदारांना काही बोलले तर अरेरावीची भाषा करतात.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पायी देखील चालणं मुश्किल झालं आहे.सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी पाहता कापड बाजार मध्ये खुप मोठ्या प्रमाणात नियम बाह्य कारभार चालला आहे.
हे अतिक्रमण त्वरित हटवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेईल,असा इशारा देण्यात आला.
निवेदन स्वीकारताना अहमदनगर महानगरपालिका उपायुक्त मा.पठारे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,महासचिव योगेश साठे,जीवन पारधे सर,संघटक फिरोज पठाण,पंकज केंडले,सुनील भिंगारदिवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.