अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यात सहा दिवसापूर्वी भानगाव येथे आढळून आलेल्या मृत कावळ्याचा अहवाल शनिवारी प्रशासनाला प्राप्त झाला असून, भानगावचा बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे नगरमध्ये बर्ड फ्लू दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील मृत ५० कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू या पार्श्वभूमीवर ठोस उपाय योजना केल्या आहेत असे पशुसंवर्धन अधिकारी सुनील तुंभारे यांनी सांगितले.