Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Ahmednagar News : मंगरूळ बु. ( शेवगाव) येथील मंगरूळ बु. ते वाडगाव रस्त्यावरील रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग व ग्रामस्थांच्या सतर्कतेने ‘सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मंगरूळ बु. येथील शेतकरी सावळेराम विघ्ने यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. संबंधित शेतकरी सकाळी शेतात गेल्यानंतर बिबट्या बिहिरीत पडल्याचे लक्षात आले. रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा.

परिसरात बिबट्या आढळल्याने मंगरूळ बु., वाडगाव, अंतरवली, कोळगाव परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती बन विभागाला कळविली.

ग्रामस्थ व तरुणांच्या सहकार्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागरिकांनी सतर्क रहावे मंगरूळ बु. परिसरात बिबट्या आढळून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले असून, परिसरात यापूर्वी बिबट्या प्रत्यक्षात आढळून आला नव्हता.

आज प्रत्यक्षात विहिरीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन मा.सरपंच, बाळासाहेब विघ्ने यांनी केले आहे.