अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत श्रीरामपूर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु याला विरोध दर्शवत माजी आ. भानुदास मुरकुटे व माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी श्रीरामपूर शहरातील लहान-मोठे व्यावसायिक व व्यापार्यांंनी
आज रविवार दि. 13 सप्टेंबरपासून आपली दुकाने व व्यवसाय नियमितपणे सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार चालू ठेवावीत.
श्रीरामपूर लॉकडाऊनला (बंद) आपला पूर्ण विरोध असून व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवू नयेत. छोटे-मोठे व्यावसायिक व व्यापार्यांना कोणी बंद ठेवणेबाबत दमदाटी केली अथवा बळजबरी केली
तर आपण व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहणार आहोत असे आवाहन केले. मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार्या सर्वपक्षिय श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनने केले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved