जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या भीतीने निर्बंध; तिसऱ्या लाटे आधी….

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- अहमदनगर : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा शक्यता गृहित धरून काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे तालुकानिहाय घेत आहेत.

तसेच आरोग्य विभागही गावागावांत लसीकरण मोहिमे राबवित आहे. तालुक्‍यातील कोविड सेंटरची संख्‍या वाढवुन, त्‍यातील सोयी सुविधांचे नियोजन करावे, कोविड सेंटरमध्‍ये औषधे, ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करून ठेवावा,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या सर्व कामांच्‍या नि‍रीक्षणासाठी निरीक्षण म्‍हणून एका अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, तसेच लसीकरण वाढविण्‍यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक यांना लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्‍यावे.

जास्‍तीत-जास्‍त लसीकरण व चाचण्‍या कशा होतील, याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत. दुसऱ्या लाटेच्या वेळी रुग्णांना बेडची उपलब्धी होत नव्हती. तशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी तालुका स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालयांसह उपरुग्णालय व ग्रामीण रुगणालयाचे मिळून एकूण १३४ व्हेंटिलेटर बेड आहेत. तसेच जिल्ह्यात खासगी व्हेंटिलेटर बेड असून, सर्व बेड सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात नागरिकांची आरोग्य तपासणी व लसीकरणाच्या कामाबरोबरच दैनंदिन रुग्णांना औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातून सुरू आहे. तसेच मुलांचे लसीकरणही सुरू असून, कोरोना जनजागृतीचे कामही कर्मचारी करीत आहेत.