अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-निवृत्त नायब तहसिलदार अनिल भागवत जोशी यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्षांचे होते.
त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व. अनिल जोशी यांच्या पश्चात मुलगा श्रीकांत, मुलगी शुभांगी देशमुख, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. चितळेरोडवरील प्रिया ऑईल डेपोचे संचालक विष्णू देशमुख यांचे ते सासरे होत.