निवृत्ती महाराज देशमुख ‘ह्या’ पुरस्काराने सन्माननीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे निवृत्ती महाराज देशमुख यांना ‘गौरव भूमिपुत्राचा, सन्मान कर्तृत्वाचा’ या पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले. येथील खंडेश्वर देवस्थान ट्रस्टकडून माध्यमातून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गावचे नूतन सरपंच व उपसरपंच यांचाही सत्कार करण्यात आला.ब्रह्मलीन स्वामी सुदर्शन महाराज यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या हस्ते समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना ‘गौरव भूमीपत्राचा, सन्मान कर्तृत्वाचा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचाही सत्कार करण्यात आला. समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख, डॉ.रामकृष्ण महाराज लहवीतकर, आमदार डॉ. किरण लहामटे व खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे यांच्या हस्ते सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी हभप मदन महाराज वर्पे, हभप विवेक महाराज केदार, हभप फरगडे महाराज, किरण महाराज शेटे, हभप शांताराम पापळ, माजी सभापती विठ्ठलराव चासकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शांताराम संगारे यांनी केले. आभार प्रदीप हासे यांनी मानले.

अहमदनगर लाईव्ह 24