अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे.
त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.
थोरातांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये कोठेतरी शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. यावेळी बोलत असताना पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे
असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात म्हणाले
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved