अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली.
परंतु आता कुठे कांद्याच्या रूपाने कुठे आशा दिसत असतानाच कांद्याची निर्यातबंदी या शेतकर्यांच्या दुःखावर केंद्र सरकारने दिलेल्या डागण्या आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
चार पैसे शेतकर्याला मिळण्याच्या वेळेसच केंद्र सरकारने असा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे, असेही ते म्हणाले. महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री थोरात यांनी कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. दूध दराबाबत बोलताना थोरात म्हणाले, ज्यावेळी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड दूध आहे, दुधाची भुकटी आहे,
अशावेळी भुकटी आयात केल्यामुळे दुधाचे दर कोसळले. कारण भुकटी तयार करण्याचे जे उत्पादन होते, ते थांबले. त्यामुळे हे सगळे निर्णय शेतकर्यांच्या, सर्वसामान्यांच्या विरोधी असून त्याचा आम्ही निषेध करतो.
दरम्यान, ‘ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बाजारातील कांद्याचा पुरवठा सुरळीत व भाव आटोक्यात राहणे आवश्यक आहे. मात्र, या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
गरज पडल्यास केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेल्या एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून किमती स्थिर कराव्यात. मात्र, कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा,’ अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved