महसूलमंत्री विखे महायुतीच्या बैठकीस निघाले..रस्त्यातच विद्यार्थ्यांचा सुरु होता रास्तारोको..विखेंनी त्यानंतर जे केलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगरमधील देहरे येथील विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत रास्तारोको केला. हीच गोष्ट महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आली.

ते यावेळी महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे निघालेले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी त्वरित गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांतच जाऊन उभे राहिले. यावेळी त्यांनी प्रश्न समजून घेत देहरे येथे महामंडळाच्या बस गाड्या थांबविण्यासाठी परिवहन विभागाच्या

अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल खुद्द मंत्र्यांनीच घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

त्याचे झाले असे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे निघाले होते. यावेळी देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित आपल्या वाहनातून उतरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनास्थळी हजेरी लावली. त्यांचे प्रश्न समजून घेतले.

देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत. परंतु समस्या अशी आहे की, नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे यावेळी केली.

विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभार्य लक्षात येतंच विखे यांनी त्यांना शहरातील बंधन लाॅन्समध्ये येण्यास सांगितले होते. येथील महायुतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणत विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे

नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थाबतील व ही कार्यवाही त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आपली मागणी अवघ्या काही तासात पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा आनंद झाला होता.