राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहर व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत व महिला पक्ष निरीक्षक स्वाती नेवलेकर यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात पार पडली.

यावेळी तालुकानिहाय बुथ कमिट्या, महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष कार्यकारिणी यांचेकडून आढावा घेण्यात आला. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व महिला पक्ष निरीक्षक स्वाती नेवलेकर यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड व महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केले.

यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, निर्मला मालपाणी, शेवगाव प.स.सदस्य मनिषा कोळगे, स्वाती शेणकर, चित्रा बर्डे, अर्चना पानसरे, अलका कोते, रागिणी लांडे, मिनल भिताडे, रजनी निंभोरे यांच्यासह शहर व जिल्हातील महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

यावेळी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी मिनल भिंताडे व अकोले शहर अध्यक्ष पदी भिमाताई रोकडे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

या बैठकित राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहभर कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून विविध सामाजिक उपक्रम घेण्यासंबधी सूचना करण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील आगामी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकासंदर्भात आढावा घेण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24