मोकाट जनावरांना वाचविताना अपघातात रिक्षा चालक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-श्रीरामपूर येथील नेवासा रस्त्यावर बाजार समितीसमोर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकींचा अपघात घडला असून या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर प्रवासी वृद्ध महिला जखमी असून उपचार सुरू आहेत.

हरेगाव येथून रिक्षा प्रवाशी घेऊन शहरात येत असताना समोरुन आलेल्या दुचाकीची रिक्षाला धडक बसली. रस्त्यावर आलेल्या मोकाट जनावरांना चुकविण्यासाठी दुचाकीस्वार आणि रिक्षा समोरासमोर आल्याने अपघात घडल्याचे अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी सांगितले.

या अपघातानंतर हरेगाव येथोल आतिश भास्कर शिंदे, वय ३८ आणि गयाबाई चंद्रभान खाजेकर, वय ७० हे जखमी झाले असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागरिकांनी तातडीने कामगार रुग्णालयात हलविले. परंतु शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार दुचाकी घेऊन सुसाट वेगात पसार झाला असून जखमी खाजेकर यांच्यावर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अपघातातील पसार दुचाकी स्वाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोकाट जनावरांना वाचविताना बिचाऱ्या रिक्षा चालकाला आपला जीव गमवावा लागला. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24