अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात दंगल ! पोलिसांची धावपळ; तात्काळ घटनास्थळी दाखल आणि नंतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर दुपारची वेळ, गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक चहुबाजुच्या रस्त्यांनी, गल्ली बोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला. त्यांनी आक्रमक होत मोठमोठ्याने प्रक्षोभक घोषणा देण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांचा मोठा फौजफाटाही गावात दाखल झाला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरु केली. मग पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर जोरदार लाठीमार केला तसेच अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगवून दंगल नियंत्रणात आणली.

नगर तालुक्यातील अरणगावात गुरुवारी (दि. १४) दुपारी घडलेल्या या घटनेने गावातील गावकरी चांगलेच भयभीत झाले होते. थोड्यावेळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे नगर तालुका पोलिसांचे मॉक ड्रिल (दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक) असल्याचे समजल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवास येत्या ४-५ दिवसांत सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुका, भिंगार कॅम्प तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने तालुक्यातील संवेदनशील असलेल्या

अरणगाव, वाळकी व वडगाव गुप्ता या गावात गुरुवारी (दि. १४) दुपारी नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्यासह पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार व महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा यांनी हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले.

ही दंगल नियंत्रण प्रात्याक्षिके दुपारी १२ च्या सुमारास अरणगाव येथे करण्यात आली व त्यानंतर वाळकी व वडगाव गुप्ता या गावात मुख्य रस्त्यांवरून पोलिसांचे संचलन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सार्वजनिक उत्सवांमध्ये गावात अचानक दंगल उसळली तर काय करावे याचेही प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात आले.