अहमदनगर बातम्या

वाढत्या तापमानाचा दूध व्यवसायाला फटका !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वाढत्या तापमानामुळे दूध व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शिवारातील हिरव्या चाऱ्यावरही झाला आहे. पाणी पातळीत घट झाल्याने दुभती जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

तालुक्यातील अनेक भागात विहिरीसह कुपनलिकांनी तळ गाठल्याने हिरवा चारा दुर्मिळ झाला आहे. चाराटंचाईचा दुग्धव्यवसायावर परिणाम झाला आहे. संकरित गायीचे दूध सहज उपलब्ध होत असले, तरी म्हशीचे दूध मिळेनासे झाले आहे. हिरवा चारा नसल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत सापडला आहे.

ग्रामीण भागात अनेक गावांत गायगोठा योजनेमुळे शेतकऱ्यांकडे संकरित गायी वाढवल्या. परंतून उन्हाळ्यात चारा, पाणी समस्येमुळे गायी कमी झाल्या आहेत. लहरी निसर्गामुळे उन्हाळ्यात चाराटंचाई हमखास जाणवते. यंदा तर पशुधनास चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

महागडे पशुखाद्य, पाणी, चारा, वैद्यकीय उपचार करत दुभती जनावरे सांभाळणे कठिण बनले आहे. दुभत्या जनावरांना वेळेवर पुरेसा हिरवा चारा, पाणी दिले तरच दुधाचे प्रमाण टिकून राहते. दूध देणारी जनावरे पोसली जात असली,

तरी भाकड झाली तर त्यांना पोसणे मात्र अवघड जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात तात्पुरती हिरवा चाराटंचाई निर्माण होते. परंतू यंदा अल्प पावसामुळे हिरवा चाऱ्याची समस्या दुग्धव्यावसायिकांना डोके दुखी ठरत आहे.

या परिस्थीतीमुळे पशुधन कमी होत चालले आहे. एरवी पावसाळ्यात जनावरे पोसली जात असली, तरी उन्हाळ्यात दुभती जनावरे पोसणे अवघड असते. दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती, महागडे पशुखाद्य, विकतच्या हिरवा चारा यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत. अलीकडे जनावरे सांभाळणे अवघड असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.

दुभत्या जनावरासाठी हिरवा चारा उपलब्ध नाही.

साधारण दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर दुभती जनावरांची खरेदी केली जातात. यंदा आहे ती जनावरे कशी पोसायची हा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे. गायी, म्हशीच्या किमती वाढल्या आहेत म्हणून दुधाचे दर वाढले आहेत. हे जरी खरे असले तरी विकतचा चारा घेऊन दुभती जनावरे पोसणे अवघड झाल्याचे पशुपालन शेतकरी सांगतात.

दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याअभावी दुभती जनावरे सांभाळणे पशुपालकांना अवघड बनले आहे. काही ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरींना पाणीच नसल्याने जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकला कसरत करावी लागत असल्याचे पशुपालक संजय पुंड यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office