अहमदनगर बातम्या

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अकरा गावांतील रस्त्यांची दुर्दशा हटवणार : काळे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांचा अनुशेष मोठा असून हां अनुशेष मोठा असला तरी तो भरून काढणे शक्य आहे.

या अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवून नागरिकांना येणाऱ्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथे केले.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी येथे ३ कोटी २५ लाख निधीतून करण्यात येणाऱ्या वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा रस्त्याच्या मजबुतीकरण

तसेच २४ लाखांच्या निधीतून वाकडी स्मशानभूमी ते किसनराव कोते घर, एकनाथ शेळके घर ते अमोल लहारे घरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत १०० केव्हीए ट्रान्सफार्मर लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, वाकडीचे सरपंच संपतराव शेळके, रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात,

जळगावचे सरपंच शिवाजी साबदे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप लहारे, बाळासाहेब भोरकडे, प्रभाकर येलम, अरुण बोंबले, अशोकराव काळे, चंद्रशेखर लहारे, शंकरराव लहारे, शिवाजीराव जगताप उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office